1

!! वीरशैव कक्कय्या ढोर समाज या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !!

3

१)मा.श्री.रमाकांत नारायणेसाहेब.(एस.इ).रहिमतपूर संपर्क-९९८७८९२०६३. २)श्री.दिपक पोपटराव कळंबे.येवला (नाशिक).संपर्क-९७३०५६७५४३ Email Id:- dhorsamaj@gmail.com / kakkayasamaj@gmail.com

4

कक्केरी निवासी महाप्रसादी श्री संत वीरशैव कक्कय्या महाराज

श्री कक्कया स्वामी गुरुराज वर्यम । वीरशैव धर्म हितस्य दक्षम ॥

कक्करी क्षेत्र निवासीनम त्वम । नमामी अनुभवमन्टपम वरिश्टम ॥

शरण कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम । श्री कक्केरीधीराज महाप्रसादी ॥


Click here(नाव नोंदणी सुरू आहे.​)

करियर

स्पर्धा परीक्षा विषयी महत्वाच्या वेब-साईट.......

D.T.ed and other info...

सर्व रोजगार विषय माहिती ...

Staf Selection of exam info...

UPSC exam info....

Ded CET info.......

MPSC info....

MPSC Online application 

http://estudyexam.blogspot.in/ 

*********************************

  • स्कॉलरशिप बाबत उपयुक्त लिंक.
********************************

जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी - Forms 

 **************************************

दैनिक लोकसत्ता मधील लेख जसाच्या तसा देत आहे. गरजूंनी उपयोग करावा.  

नौदल अधिकारी व्हायचंय?

लेख
करिअर फाऊंडेशन, सोमवार, १५ ऑगस्ट  २०११
altकार्यकारी विभाग ((Executive Branch)
या विभागातील नौदल अधिकारी हे युद्धनौकेचे, पाणबुडी तसेच विमानाचे प्रमुख असतात. नौदलाचे प्रमुख याच विभागातील अधिकारी बनतात. या विभागाच्या अधिकाऱ्यांना युद्धनौकेचं व्यवस्थापन करता येणं अत्यावश्यक मानलं जातं. युद्धकाळात युद्धनौकेचा एक हत्यार म्हणून वापर करणारे असे अधिकारी ताफ्याचे मुख्य आधारस्तंभ ठरतात.
या अधिकाऱ्यांना पाणबुडीविरोधी पथक, नेव्हिगेशन कम्युनिकेशन, दारूगोळा, लॉजिस्टिक, डायव्हिंग व हायड्रोलॉजी आदी विषयांत स्पेशलायझेशन करता येतं. त्याबरोबरीने नौदलाचा हवाई विभाग तसेच पाणबुडी विभागातदेखील काम करता येतं.


एव्हिएशन ऑफिसर 
हवाई क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना नौदलामध्ये पायलट किंवा ऑब्जव्‍‌र्हर म्हणून काम करता येईल. नौदलाचे पायलट युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरवरून किंवा किनाऱ्यावरील तळावरून विमाने घेऊन आकाशात झेपावतात. उच्च दर्जाचे पायलट युद्धनौकेवरून विमान उडवतात. यांचं काम प्रामुख्याने शत्रुच्या युद्धनौका व पाणबुडय़ांचा शोध घेऊन त्या नष्ट करणं हे असतं. मार्गापासून भरकटलेल्या जहाजांचा माग घेणं, त्यांची सुटका करणं हाही त्यांच्या कामाचा एक भाग असतो.

सबमरिन ऑफिसर्स 
साहसपूर्ण जीवन जगण्याची इच्छा, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व प्रशिक्षणामध्ये वादातीत कौशल्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना पाणबुडय़ांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. अत्याधुनिक क्षेपणास्त्र, मारा करणाऱ्या शस्त्रास्त्र नियंत्रण व्यवस्था, संगणकीकृत मशिनरी यांसारख्या सुविधा असलेल्या तसेच राहाण्यास अत्यंत चांगल्या अशा आधुनिक पाणबुडय़ांवर यांना प्रशिक्षण दिलं जातं. खडतर प्रशिक्षणानंतर नौदलामध्ये मानाचा समजला जाणाऱ्या डॉल्फिन बॅजने या कॅडेटला सन्मानित केलं जातं.

हायड्रोग्राफिक ऑफिसर 
नौदलासाठी लागणाऱ्या नकाशासाठी आवश्यक माहिती गोळा करण्याचं काम हे अधिकारी करतात.

नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन ऑफिसर 
हे अधिकारी विविध एजन्सीकडून नौदलाला पुरवण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांची तपासणी करण्याचं काम करतात. याप्रमाणे शस्त्रास्त्रांविषयी संशोधन करणं, एखाद्या शस्त्रामध्ये आधुनिक बदल करणं, नव्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करणं, ही कामं या विभागामार्फत केली जातात.

प्रोव्होस्ट (Provost) ऑफिसर व लॉ ऑफिसर 
प्रोव्होस्ट अधिकारी धोरण ठरवणं, नियमन करणं, सुरक्षा व सतर्कता ठेवण्याचं काम करतात. नौदलाच्या कायदेविषयक गरजांसाठी कायदाविषयक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते.

लॉजिस्टिक ऑफिसर 
युद्धनौकांवर एकाच वेळी शेकडो लोक काम करत असतात. युद्धनौकेला एका छोटय़ा नगरीचं स्वरूपच येतं. या सर्वाना अन्न, वस्त्र पुरवणं, त्यांना वेळेवर वेतन मिळेल हे पाहाणं, त्याचप्रमाणे पाणी, इंधन व जहाजाच्या यंत्रांचे असंख्य सुटे भाग यांचादेखील पुरवठा योग्यवेळी होईल, हे सर्व पाहाणं, हे लॉजिस्टिक अधिकाऱ्याचं काम असतं.

अभियांत्रिकी विभाग 
आधुनिक जहाजं, पाणबुडय़ा व विमानं यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांचा वापर केलेला असतो. नौदल गोदीमध्ये यांच्या देखभालीचं काम केलं जातं. विविध अभियांत्रिकी शाखांचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना येथे अमाप संधी उपलब्ध आहेत.
जहाजाचं डिझाइन, बांधणी, गुणवत्ता, चाचणी, दुरुस्ती हे काम नेव्हल आर्किटेक्ट करतात.

इलेक्ट्रिकल विभाग 
युद्धनौका हे समुद्रावर तरंगणारं छोटं शहरच असतं. त्यामध्ये वीजनिर्मिती व त्यांचं वितरण करण्याची व्यवस्था असते. क्षेपणास्त्र यंत्रणा, पाण्याखालील शस्त्रास्त्रं, रडारयंत्रणा व रेडिओ कम्युनिकेशन साधनं या सर्वाचा युद्धनौकेवर समावेश असतो. या सर्वामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स व संगणकप्रणालीचा वापर केलेला असतो. युद्धनौकेने जर पूर्ण क्षमतेने लढायचं असेल, तर सर्व उपकरण पूर्ण क्षमतेने चालली पाहिजेत, हे पाहण्याचं काम इलेक्ट्रिकल अधिकारी करतात.

शैक्षणिक अधिकारी 
अधिकारी व सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं काम हे अधिकारी करतात.
सैन्यदलातील या संधीची सविस्तर माहिती घेण्यासाठी खालील वेबसाइट पाहाव्यात.

१) भारतीय हवाई दल-
www.careerairforce.nic.in     www.indianairforce.nic.in

२) भारतीय नौदल-
www.navsena-bharati.nic.in

३) भारतीय भूदल-
www.joinindianarmy.nic.inwww.indianarmy.nic.in

प्रवेश परीक्षांसाठी- 
www.upsc.gov.in,

www.upsconline.nic.in


**************************************


किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. माझ्या संकेतस्थळाला वाचकांनी दिलेल्या भेटी.

आपणास वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज या ब्लॉगची विस्तृत माहिती मिळण्याचे माध्यम कोणते?